जसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती प्रेरणादायी आहे तशी मराठी भाषा देखील. संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हंटलेच आहे,
माझिया मराठीची बोलू कौतुके l
परी अमृतातेही पैजा जिंके l
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
याच मराठी भाषेचे महत्व आणि गोडवा आपल्या बालमित्रांमधे रूजविण्यासाठी दिनांक २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनी वोल्फ्सबुर्ग मराठी मंडळ घेऊन येत आहे हसत खेळत मराठी शिकूया.
या उपक्रमाची वैशिष्ट्ये –
१. मराठी लिहिणे, वाचणे.
२. मराठी संस्कृती, सण आणि उत्सव यांची माहिती.
३. बोधकथा / छान छान गोष्टी, गाणी, खेळ आणि मुलांना आवडतील अशा माध्यमांमधून मराठी शिकणे.
४. वयोगट ६ ते १२ वर्षे.
इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याची माहिती Google Form वर भरून पाठवावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScuXPghhr_v_gRMshR-r2R57Um11f5J1CcipyPhX6Opn9fyUQ/viewform